मारणे वाडी येथे संगीत सेवेने मुळशीकर मंत्रमुग्ध
जेजुरी - ब्रह्मिभुत श्रीमद् सद्गुरू पांडुरंग नाथ महाराज जगताप ध्यान आणि संस्कार मंदिर मारणेवाडी, या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी, आपले गुरू जानकी राम (अण्णा ) जगताप यांच्या गुरुपुजनचा कार्यक्रम, दोन दिवसीय संगीत सभे द्वारा संपन्न झाला. संगीत सभेचा हा कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर मारणे वाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सभेच्या पहिल्या दिवशी जानकी राम अण्णा जगताप यांच्या १७ विद्यार्थ्यांनी तबला वादन, पखवाज वादन सादर केलले.
ह. भ. प. विजय महाराज जगताप यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या सत्राची सांगता झाली. त्यांना तबला साथ ऋषिकेश विजय जगताप यांनी केली, तर हार्मोनियम साथ माधव मारणे यांनी केली. स्वर साथ वेदांत खराद आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. राजेंद्र जी महाराज दहिभाते, यांनी केली.
दुसऱ्या दिवशी २० विद्यार्थ्यांनी आपले वादन सादर केले. त्यानंतर जगद्विख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी सर यांचे बहारदार असे बासरी वादन झाले. त्यांना तबला साथ ऋषिकेश विजय जगताप यांनी केली. बासरी स्वर साथ मोहित पुराणकर यांनी केली. पंडित कुलकर्णी यांनी बासरीवर राग क्षितिजा हा पंडित विजय बक्षी सर यांनी रचलेला राग वाजवला. पहाडी आणि भैरवी मधील अत्यंत मधुर रचना वाजवून त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली.
दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात ५० विद्यार्थ्यांचे तबला वादन झाले. त्यानंतर ऋग्वेद जानकी राम जगताप या युवा कलाकाराचे अत्यंत बहारदार असे पखवाज वादन झाले, त्याने सुल ताल वाजवला. अत्यंत उठावदार असे वादन ऐकून श्रोते भारावून गेले.
त्यानंतर सुर मणी पंडित विजय बक्षी यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन झाले यावेळी तबला साथ ऋषिकेश जगताप तर हार्मोनियम साथ अमेय बीछु यांनी केली. स्वर साथ श्री विजय दादा जगताप यांनी केली. ही मैफल म्हणजे सर्व कार्यक्रमाचा कळस होती. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कीर्तनकार राजेश महाराज मारणे आणि सुप्रसिद्ध निवेदक संतोष सर गावडे, यांनी आपल्या अनोख्या शैलीने श्रोत्यांना खिळवत ठेवत उत्तम सूत्र संचालन केले.
लक्ष्मण अण्णा वाशीवले, बापूसाहेब मारणे, संतोष मारणे , राजेश मारणे, चरवड, नारायण सपकाळ , ग्रामस्थ, विद्यार्थी , पालक या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.मारणे वाडी येथे संगीत सेवेने मुळशीकर मंत्रमुग्ध)