Type Here to Get Search Results !

उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेस क्रॉप सायन्स( द्विलक्षी अभ्यासक्रम) विषयास मान्यता

उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेस क्रॉप सायन्स( द्विलक्षी अभ्यासक्रम) विषयास मान्यता
सोमेश्वरनगर - कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागा अंतर्गत ग्रामविकास संघटना संचलित उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेस क्रॉप सायन्स( द्विलक्षी अभ्यासक्रम) विषयास मान्यता मिळाली आहे. 

सदर अभ्यासक्रम हा ११ वी व १२ वी  या वर्षांकरिता असून ह्या विषयास २०० गुण असणार आहेत. सदर विषया करिता १०० गुणांची लेखी परीक्षा व १०० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे.क्रॉप सायन्स हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात  व गुणांमध्ये भर होण्यास मदत होणार आहे.

उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेस क्रॉप सायन्स( द्विलक्षी अभ्यासक्रम) विषयास मान्यता मिळाल्या मूळे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी सावंत, शाळेचा सर्व स्टाफ व विध्यर्थी यांचे अभिनंदन केले तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test