बहुजन हक्क परिषदेच्या वतीने ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन
पुरंदर प्रतिनिधी - बहुजन हक्क परिषद या सामाजिक संवहटनेच्या वतीने सासवड येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जेजुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थीस्मारक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बहुजन समता रॅली काढण्यात आली होती. या वेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार अभिवादन करताना म्हणाले की जेजुरी गडाच्या पायथ्याशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा अस्थि आहेत.त्याठिकाणी एक छोटंसं अस्थिस्मारक आहे.हे बहुतांश लोकांना माहीत नव्हते. बहुजन हक्क परिषदेच्या वतीने गेले दहा बारा वर्षांपासून या ठिकाणी हे दुर्लक्षित स्मारक लोकांना माहीत व्हावे म्हणून प्रचार,प्रसार करण्यात येत आहे.शासनाने स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे यासाठी संघटनेचा लढा चालू आहे.हे काम एकट्याचे नसून सांघिक आहे.समाजतील सर्व संघटनाने एकत्र येऊन हा भीमरेट दिला तर फारस अवघड नाही यासाठी तुमच्या सारख्या लढाऊ भीमसैनिकांचे सहकार्य असेल तरच हे शक्य होणार आहे.यावेळी कैलास धिवार, नाना मदने, शशीभाऊ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. जेजुरी येथील अस्थीस्मारक येथे समता सैनिक दल यांनी मानवंदना दिली.भारतीय बौद्धमहासभेचे दादा गायकवाड यांनी त्रिशरण, पंचशील आणि धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जेजुरीचे आर.पी.आय.चे युवा नेते गौतम भालेराव, आर.पी.आय.चे पुणे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ जाधव,सामाजिक कार्यकर्ते भगवान डीखळे,प्रकाश धिवार,रामदास कदम,अशोक गायकवाड, कृष्णा फुलावरे,सचिन खरात,संदीप लोंढे,अविनाश भोसले,बाळासाहेब ताठीले,पप्पू धिवार, तेजस गायकवाड,समीर यादव,सिद्धार्थ यादव,धीरज यादव,आप्पासाहेब बगाडे यासह अनेक बहुजन भीम सैनिक उपस्थित महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.