महापरीनिर्वाण दिना निमित्त पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम
पुणे - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून व कोरोणामुळे बंद असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा 6 डिसेंबर रोजी सुरू झाल्या. पुण्याच्या हवेली साडेसतरानळी येथील प्राथमिक शाळेत पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अनिल गुंजाळ, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे कर्तबगार व्यक्तिमत्व राजेसाहेब लोंढे, तसेच बोलण्यामध्ये व कृतीमध्ये समतोल असणारे उरळीकांचन बीटचे विस्ताराधिकारी शब्बीर शेख यांनी शाळेला अचानक भेट दिली. यावेळी सर्व मुलांचे पुष्पगुच्छ व मास्क देऊन स्वागत करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगणित झाला. शाळेतील वाचन कोपरा पाहून व काही मुलांचे अक्षर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. एका मुलाच्या वही मधील सुंदर हस्ताक्षर पाहून व्हेरी गुड असे लिहून स्वाक्षरीही केली. शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले त्यानंतर बौद्धिक व शारीरिक विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले .शाळेचे मुख्याध्यापक वायसे सर यांचे काम पाहून त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले तर केंद्रप्रमुख धोडमिसे मॅडम यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.