माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकास केंद्रबिंदू ठरणाऱ्या श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर च्या १ लाखा व्या साखरेच्या पोत्याचा पूजन सोहळा संपन्न झाला.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आज (दि.20) पूजन करण्यात आले.
यावेळी श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, विलास आद्रट, सोमनाथ भोसले,
संचालक दत्तात्रय रणवरे, संजय कोरटकर, रामदास कर्णे, धोंडीराम नाळे, सुनील माने, नारायण सालगुडे पाटील, सुरेश मोहिते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच देविदास ढोपे, सरपंच शिवाजी जाधव, सरपंच तानाजी पालवे, कुमार पाटील, शिवराज निंबाळकर, अनंतलाल दोशी, बबन भुजबळ, दादासो वाघमोडे, एकनाथ वाघमोडे, विरकुमार दोशी, विजय रुपनवर, संतोष शिंदे तसेच श्री शंकर सहकारी चे अधिकारी आनंदराव गायकवाड, बागल, साहेब, चव्हाण साहेब, पवार साहेब, देशमुख साहेब, मोरे साहेब व इतर पदाधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.