बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवस.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भारतीय शहिद वीरांना अभिवादन
मुंबई, दि. १६ : - बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केले आहे. या युद्धातील शहिद वीर जवानांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केले आहे.
संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बांगलादेश मुक्ती संग्रामाचा आज सुवर्ण महोत्सवी विजय दिवस. या युद्धातून भारतीय सैन्याने जगासमोर मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी शौर्य आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठेवले. आपल्या शूरवीरांनी प्राणांची बाजी लावली, यात महाराष्ट्र सुपुत्रांनीही पराक्रमाची शर्थ केली. या युद्धातील शहिद वीर जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. या सर्वांच्या त्याग, समर्पणाला शतशः वंदन तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्ततेलाही नमन.