सोमेश्वरनगर - निरा (ता पुरंदर) येथे जाधव फिनटँक्स एल.एल.पी.कर सल्लागार निरा यांचा ७ वा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा बुधवार दि २९ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी श्री सोमेश्वर खडी केंद्र मुढाळे उद्योजक संतोष कोंढाळकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य निंबुत अमर काकडे-देशमुख, उद्योजक महेंद्रकुमार , महेंद्र देवकर उद्योजक मुर्डेश्वर अर्बन निधी करंजेपुल, गणेश भोसले - इंटरप्रायजेस निरा,शरद जगताप यांनी उपस्थिती लावली. जाधव फिनटँक्स एल.एल.पी. ही संस्था गेली ७ वर्षे कर सल्लागार म्हणून जवळपास बारामती, पुरंदर , इंदापूर , या तालुक्यात कार्यरत आहे. या संस्थेमध्ये शाँप अँक्ट काढणे, ईन्कमटँक्स रिटर्न भरणे, उद्यम आधार काढणे, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवने, अंतर्गत लेखापरीक्षण करणे, अन्न भेसळ नोंदणी करणे, गुड्स अँन्ड सर्विस टँक्स नंबर काढणे व विवरण पत्र दाखल करणे या सुविधा पुरविल्या जातात. निरा क्षेत्रात या सेवा पुरवणारी ही एक विश्वसनीय संस्था आहे. या संस्थेने थोड्याच दिवसात आपले निरा-सोमेश्वर पंचक्रोशीत नावलौकिक केले आहे.तसेच प्रकाशन सोहळा प्रसंगी निंबुत माजी सदस्य अमर काकडे यांनी या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी शुभेच्छाही दिल्या.
जाधव फिनटँक्स एल.एल.पी ची दुसरी शाखा के.के.मार्केट, पुणे येथे आहे.