जेजुरी दि.( प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकारने ओबीसी ची सर्व आरक्षणे हळूहळू काढून घेत संपूर्ण ओबीसी समाजावर जो अन्याय केला आहे त्याच्या निषेधार्थ ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी जन मोर्च्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुणे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रोहिदास गोरे, जिल्हा अध्यक्ष अनिल अप्पा धायगुडे, संपर्क प्रमुख महादेव वाघमोडे, मार्गदर्शक अभिमन्यू उघडे, महिला अध्यक्ष मीनाताई थोरात,युवक अध्यक्ष बाबराजे कोळेकर, गणेश पुजारी, सोमनाथ नजन, व्यंकटराव नाईक,दादा चव्हाण, अनिल चव्हाण, विजय भोजने,आदि मान्यवर उपस्थित होते राज्यभर एकाच दिवशी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षण वाचवण्यासाठी यापुर्वीच्या सरकारने काहिच प्रयत्न केले नाहीत आणि ठाकरे सरकार देखील ओबीसींचे स्थगित झालेले आरक्षण वाचवू शकले नाही कोणतेच सरकार ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना व तीव्र नाराजी समाजामध्ये निर्माण झालेली आहे याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी हे आक्रोश आंदोलन राज्यभर करण्यात आले.