मोकार फिरणारे रोडरोमिओंनो सावधान- निर्भया पथकाची असणार कडवी नजर
सोमेश्वरनगर प्रतिनीधी - बारामती तालुक्यातील बारामती ,माळेगाव तसेच सोमेश्वरनगर हे मोठे शिक्षण संकुलन झाले आहे. सोमेश्वरनगर मध्ये मु.सा.काकडे महाविद्यालय ,सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ,सह्याद्री पब्लिक स्कूल ,सोमेश्वर विद्या प्रतिष्ठान शाळा , असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम आहे चालू आहे . या शाळा महाविद्यालय परिसरात रोड रोमिओ करणारे टोळकं मोठ्या प्रमाण वाढ झाली आहे , यावर आळा बसण्यासाठी निर्भया पथक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांनी निर्भया पथकाचे आभार व्यक्त केले.
तर हे पथक एक आठवड्यात दोनदा या परिसरात येत असून मुलांवर गुन्हे दाखल करत त्यांना समस दिली जात असून सोमेश्वर परिसरातील महिलांवरील अत्याचार लैंगिक छळ छेडछाड महिलांविषयक गुन्हे नियंत्रण करणे आणि गुन्हेगाराची मानसिकता बदलणे हे आजच्या घडीला पोलिसांसमोर मोठं आव्हानच आहे .महिला सुरक्षितेसाठी निर्भया पथकाची ऑगस्ट 2016 रोजी स्थापना केली आहे. निर्भया पथकाच्या स्थापनेमुळे महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत झाली आहे , पुणे जिल्ह्यात निर्भया पथकाच्या माध्यमातून काम सुरू आहे . जिल्हा पातळीवर पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते ,बारामती उप विभागीय पो अधिकारी गणेश इंगळे ग्रामीण शहरी भागांमध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय पथकाचे काम चालते प्रत्येक जिल्ह्यात पथकाची स्थापना करण्यात आली आहे . विभागीय पोलिस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांचे बारामती विभाग करिता नियंत्रण आहे. बारामती निर्भया पथक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे,महिला पोलीस अंमलदार अमृता भोईटे,सुप्रिया कांबळे,हेमा सूर्यवंशी ,बारामती शहर पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे ,वडगांव पोलीस ठाण्याचे दिपक वारुळे, नामदेव साळूंखे या टीममध्ये काम करत आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
शाळकरी मुलींनी न घाबरता तक्रार मोबाईल 99220 17400 करावी त्यांचे नाव गोफणीय राहील तसेच मुली व महिलांसाठी हे पथक गावोगावी तसेच शाळांना भेट देत जनजागृती करत आहे. निर्भया पथकामुळे महिलांवर होणारे अन्याय रोखण्याचा या पथकाचा मानस आहे.
महिला सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■