पुणे (प्रतिनिधी सुभाष कदम )- भारती विद्यापीठ परिसरात काॅंग्रेस कार्यकर्ता समीर शेखचा गाेळ्या झाडून खून
भारती विद्यापीठ परिसरातील हाॅटेल चंद्रभागा समाेर दुपारी १२ च्या सुमारास अचानक दुचाकीवरून आलेल्या मारेक-यांनी काॅंग्रेसचा कार्यकर्ता समीर शेख याच्यावर दिवसाढवळ्या ६ गाेळ्या झाडल्याने समीर शेख रक्ताच्या थारोळ्यात काेसळला
दुचाकीवरून आलेले अज्ञात मारेकरी फरार झाले.याकामी भारती विद्यापीठ पाेलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भारती विद्यापीठ पाेलीसांनी परिसरात नाकाबंदी केली असून मारेक-यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. समीर शेखचा खून हा अंतर्गत वादातून झाला असल्याचा अंदाज भारती विद्यापीठ पाेलीसांनी व्यक्त केला आहे. मात्र दिवसा ढवळ्या गजबजलेल्या परिसरात झालेल्या खूनामुळे पुणे शहर हादरुन गेले आहे.