धालेवाडीत भैरवनाथ पॅनेलचा दारुण पराभव क-हा वि. का. सोसायटीवर सहकार विकास पॅनेलचे वर्चस्व
विरोधकांचा १३-0 ने पराभव
जेजुरी दि.13 - पुरंदर तालुक्यातील आदर्श गाव मौजे धालेवाडी येथील क-हा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक सहकार परिवर्तन पॅनेलने १३-0 ने जिंकून भैरवनाथ पॅनेलचा दारुण पराभव केला आहे, संस्था स्थापनेपासून कायम बिनविरोध होणारी सोसायटी विरोधकांच्या हट्टापायी निवडणूकीच्या भोव-यात आडकली परंतु सहकार विकास पॅनेलने भैरवनाथ परीवर्तन पॅनेलचा दारुण पराभव करत १३-0 ने हि निवडणूक जिंकली निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - संभाजी शिवाजी काळाणे (मते १२७) रमेश वसंतराव लेंडे (मते १२९) रामदास दिनकर काळाणे (मते १२४) महादेव यदू कदम (मते १२१) लक्ष्मण मारुती कदम (मते १२०) शंकर साहेबराव काळाणे (मते १२०) आबुराव विठोबा खैरे ( मते १२०) देवराम राजाराम साबळे (मते १२०) मुरलीधर नारायण साबळे (मते ११९)अविंदा धोंडिराम जगताप (मते १२९) सुरेखा दादासो साबळे (१२६) अनंता भगवान साबळे (मते १३४) वसंत विष्णु भालेराव (बिनविरोध) काल (दि.१२)रोजी पार पडलेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सह निवडणूक अधिकारी म्हणून अमिरण बागवान,यु. एन. मदणे,एस. बी. पवार यांनी काम पाहिले, मुकूंद जगताप,एस एस कुलकर्णी, बशीर सय्यद, गवळी,डी.पी. सफार आदिंनी मतमोजणी केली निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. नंदकुमार सोनलकर, बिट अंमलदार व्हि. डी. मुत्तमवार, सहाय्यक फौजदार चंदकांत झेंडे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला होता विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची व भंडा-याची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला