मु.सा.काकडे महाविद्यालयात अंतर विभागीय मुले मुली कुस्ती स्पर्धा संपन्न
सोमेश्वरनगर (दिनांक १०/१२/२०२१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय मुले व मुली कुस्ती स्पर्धा दिनांक 8 व 9 रोजी मु.सा.काकडे महाविद्यालय येथे पार पडल्या.
बुधवार दिनांक ८/१२/२०२१ रोजी मुलींच्या कुस्ती स्पर्धा झाली.या स्पर्धेचे उद्घाटन सौ. तेजस्विनी काकडे यांच्या शुभाहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती पंचायत समितीच्या सभापती सौ.नीताताई फरांदे होत्या, यावेळी बारामती पंचायत समिती सदस्या,मेनकामगर, वाघळवाडी-सोमेश्वर नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा सकुंडे उपस्थित होत्या, यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहार चौधरी नवनियुक्त प्राचार्य डाॅ.देवीदास वायदंडे,उपप्राचार्य जगन्नाथ साळवे, सहसचिव सतीश लकडे, सर्व विभागाचे उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतामध्ये नीताताई फरांदे यांनी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाने मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर, अहमदनगर व नाशिक येथून कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असणा-या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जवाहर चौधरी, यांनी कुस्ती इतिहासावर संक्षिप्त प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी यशापयशाची चिंता न करता खिलाडू वृत्तीने स्पर्धेत सहभागी व्हावे असे सांगितले.
याप्रसंगी या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक दिनेश गुंड व त्यांचे सहकारी यांनी पारदर्शकपणे काम पाहिले.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्याला मुलींचे सांघिक विजेतेपद मिळाले व अहमदनगर जिल्ह्याला उपविजेतेपद मिळाले. यशस्वी संघाला व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता भोईटे, उपप्राचार्य कदम मॅडम.सणस मॅडम,पवार मॅडम, होळकर मॅडम यांच्या शुभाहस्ते गौरवण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले व आभार प्रा.दत्तराज जगताप यांनी मानले.
दिनांक ८/१२/२०२१ रोजी मुलांच्या फ्रीस्टाइल व ग्रीको-रोमन या दोन्ही प्रकारात कुस्त्या पार पडल्या या स्पर्धेचे उद्धघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती मा.प्रमोद काकडे-देशमुख होते व प्रमुख पाहुणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे होते.
याप्रसंगी काकडे यांनी आपल्या मनोगता मध्ये महाराष्ट्रातील खेळाडू खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालवून ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने पदक मिळवून द्यावे.असे आव्हान केले.तसेच या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे राजवर्धन शिंदे यांनी कुस्तीगिरांना यशस्वी व्हायचे असेल तर अफाट मेहनत करून व यश मिळवून प्रयत्न केले पाहिजे व त्या बरोबर युपीएससी व एमपीएससी परीक्षा देऊन उच्च पदावर नोकरी करण्याची संधी मिळवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देऊन महाविद्यालयातर्फे या स्पर्धेदरम्यान आपणास कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही याची ग्वाही दिली. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक आर एन बापू शिंदे यांनीदेखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व नवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक प्रसिद्ध पै.तानाजीबापू सोरटे यांनी नारळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.
या याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे नूतन संचालक व व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत काकडे- देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, महाराष्ट्र चॅम्पियन पै.विकास जाधव, पै.भाऊसाहेब गायकवाड, उपस्थित होते .
या स्पर्धेमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात पुणे जिल्हा संघाने सांघिक विजेतेपद मिळवले व नाशिक संघाने उपविजेतेपद मिळवले तर ग्रीक रोमन प्रकारामध्ये अहमदनगर संघाने सांघिक विजेतेपद व पुणे जिल्हा संघाने सांघिक उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्रा.दिनेश गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारदर्शकतेने कुठल्याही तक्रारी विना स्पर्धा पार पाडल्या.
या याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागाचे उपप्राचार्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील कुस्ती शौकिन उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजन सचिव डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले व आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी मानले.