सोरटेवाडी तंटामुक्ती अध्यक्ष पदी बाळासाहेब सोरटे तर शाळा व्यवस्थापन समिती पदी बापूराव गोरे यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यलयात शुक्रवार दि 10 पार पडली, यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब मारुती सोरटे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश बापूराव गोरे यांची एकमताने निवड कऱण्यात अली,
यावेळी उपसरपंच अलका चव्हाण, नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री सोमेश्वर साखर कारखाना संचालक संग्रामभाऊ सोरटे , श्रीपाल सोरटे, ज्ञानदेव सोरटे ,चंद्रशेखर सोरटे , शेखर सोरटे ,सुशांत सोरटे , छाया कोरडे ,अर्चना मासाळ, संभाजी कर्चे ,विकास पवार , बाळासो शिरसागर , सागर बांदल ,संतोष ननावरे , गणपत घाडगे , नरेश खोमणे, संतोष गोडसे तसेच प्राथमिक शाळा सोरटेवाडी चे मुख्याध्यापक सुरेश खामकर व शिक्षक वृंद उपस्थित होते, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्योती काळभोर यांनी कामकाज पाहिले.