सोमेश्वर मंदिर येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस साजरा...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा , माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
दरवर्षीप्रमाणेच रविवार दि.१२ रोजी सकाळी सोमेश्वर मंदिरात (ता बारामती) मान्यवरांच्या हस्ते शरदचंद्र पवार साहेब यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी महारुद्र अभिषेक राष्ट्रवादी पक्ष्याचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला पुरोहित म्हणून मुकेश भांडवलकर होते.
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी केकचे आयोजन करत उपस्थिती मन्यावरच्या हस्ते केक कापन्याचा कार्यक्रम बांधकाम व आरोग्य पुणे जिल्हा सभापती प्रमोद काकडे ,श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप तसेच देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर, कारखाना संचालक राजवर्धन शिंदे, शैलेश रासकर ,दक्षता कमिटी सदस्या सुचिता साळवे, या मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरात संपन्न झाला..या प्रसंगी देवस्थान सचिव राहुल भांडवलकर ,खजिनदार सोमनाथ भांडवलकर,जेष्ठ नागरिक यादवराव शिंदे, करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, मा. सरपंच प्रकाश मोकाशी,माजी संचालक अँड.रुपचंद शेंडकर,चोपडज उपसरपंच निलेश भंडलकर ,वाकी सदस्य सुधीर गायकवाड, वाकी युवक राष्ट्र. बु. अध्यक्ष अनिल भंडलकर, चौधरवाडी माजी उपसरपंच तानाजी भापकर ,करंजे मा तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड,माजी सैनिक नितीन शेंडकर व पत्रकार विनोद गोलांडे सह सोमेश्वर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.