Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात एकाच दिवशी १ लाख २४ हजार मोफत सातबारा वाटप

जिल्ह्यात एकाच दिवशी १ लाख २४ हजार मोफत सातबारा वाटप
पुणे दि.८- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या मोफत ७/१२ वाटप मोहिमेचा एक भाग म्हणून ७ डिसेंबर (७-१२)  रोजी जिल्ह्यातील ६६३ गावात एकाच दिवसात १ लाख २४ हजार मोफत सातबारा वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून १२ लाख ३४ हजार खातेदारांपैकी  ११ लाख ५६ हजार अर्थात ९३ टक्के खातेदारांना  ७/१२ वितरण करण्यात आले आहे. मंगळवारी आयोजित विशेष मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी सजांच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना ऑनलाईन ७/१२ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ही सुविधा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १५ रुपये शुल्क ऑनलाईन अदा करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी हवे असलेले ७/१२डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख  यांनी केले आहे.

जिल्ह्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे ४ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी पीकपाहणीची नोंदणी केली आहे. जिल्ह्यात मुळशी, खेड, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर वगळता इतर सर्व तालुक्यात रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी झालेल्या पिकांची नोंद ‘ई-पीक पाहणी (E-Peek Pahani)’ या मोबाईल ॲपवर अपलोड करावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test