१९८७-८८ या वर्षी दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
सोमेश्वरनगर - बारामतीतील होळ येथील आनंद विद्यालयात सन १९८७-८८ या वर्षी दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला. एकमेकांच्या सुख दुःखाच्या गप्पा मारून दिवाळीचा आनंद त्यांनी साजरा केला. तब्बल ३० वर्षानंतर ८२ वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. सर्वजण एकमेकांशी बोलताना जुन्या आठवणीत रंगून गेले. एकमेकांच्या सहवासातील मेळाव्याचा हा दिवस बालपणात आम्हाला घेऊन गेला, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब कर्वे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरेश ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. दादासाहेब मोरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र पवार, विठ्ठल राणे, रंजना लंगड, दीपक खुडे आदी उपस्थित होते.