...झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन-अण्णा हजारे
जेजुरी दि.९(प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई,बदल्यांचा कायदा, दारु बंदी, असे अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही सरकार कडून त्याची अंमलबजावणी व्हावी अन्यथा येत्या काळात तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडकर, रमेश लेंडे, प्रकाश पाचारणे, राजेंद्र जावळेकर, सुरज साबळे यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली त्याप्रसंगी अण्णा बोलत होते
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीची नव्याने बांधनी सुरू केली असुन लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे अण्णांनी सांगितले, कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा देश कायद्याच्या आधारावर चालला आहे झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी झाली नाही तर एकाच वेळी सर्व राज्यातून देशव्यापी आंदोलन केले जाईल असा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे