हरणीत गड -किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
पुरंदर - हरणीत ( ता.पुरंदर ) येथे दिपावली निमित्त आयोजित गड –किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांसह पुरंदरचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी अमोल यादव युवा मंच यांच्या वतीने या दिवाळी गड -किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ३३ लहानग्यांनी या स्पर्धत सहभाग नोंदवला होता.यामध्ये मोठ्या गटात श्रुती यादव हिने प्रथम क्रमांक मिळवला तर व्दितीय क्रमांक श्लोक यादव तसेच तृतीय क्रमांकासाठी करण यादव याची वर्णी लागली आहे .
त्यातच लहान गटात प्रथम क्रमांक शिवराज यादव, व्दितीय जय यादव तर तृतीय क्रमांक सुरज यादव याने संपादित केला आहे.यावेळी सर्व विजेत्यांना ट्रॉफी व क्रमांकानुसार रोख रकमेचे बक्षीस तसेच उत्तेजनार्थ सर्वच स्पर्धकांना भेट वस्तू देखील अजिंक्य टेकवडे तसेच पुष्कराज जाधव यांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत .
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम, शंकर यादव ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश यादव ग्रामपंचायत सदस्या पल्लवी यादव,तसेच विद्या यादव , किरण चौंडकर ,रवींद्र यादव ,महेश कड ,अमोल यादव, सागर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार बळवंत यादव यांनी मानले.