"सती मालुबाई मंदिर" करंजे परिसरात दीपावली निमित्त दीपोत्सव.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील "सती मालुबाई मंदिर" हे सोमेश्वर मंदिर करंजे माळवाडी नजीक असून तेथे दर अमावस्या निमित्त भाविक भक्त मोठ्या मनोभावे येत असतात, तसेच गुरुवारी दि 4 रोजी दीपावली लक्ष्मी पूजन चे औचित्य साधत येणाऱ्या भक्त भाविकांनी सोमेश्वर नगर परिसरातील ग्रामस्थ मान्यवरांनी दिपोत्सव साजरा करत मंदिर व मंदिर परिसरात मेणबत्ती , पणती दिवे लावत दीपोत्सव साजरा केला.
यानिमित्ताने "सती मालुबाई मंदिर" परिसर दीपोत्सवाने लख्ख दिसत होता, येणाऱ्या भाविक भक्तांना ही समाधान व्यक्त केले तर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून गोड अल्पोपहाराचा आस्वाद ही देण्यात आला.