Type Here to Get Search Results !

घवघवीत यश ! आय आय टी बॉम्बे मध्ये प्रवेश मिळवत सोमेश्वर च्या हृषीकेश जेधे देशमुख चे अभूतपूर्व यश.

Top Post Ad

घवघवीत यश ! आय आय टी बॉम्बे मध्ये प्रवेश मिळवत सोमेश्वर च्या हृषीकेश जेधे देशमुख चे अभूतपूर्व यश.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी,बारामती च्या हृषीकेश जेधे चा आय आय टी बॉम्बे वरती झेंडा ......हृषीकेश शशिकांत जेधे देशमुख , रा. वाणेवाडी , ता. बारामती याला भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी मुंबई -पवई )येथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश प्राप्त झाला आहे . नुकत्याच झालेली प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स 2021 मध्ये ऑल इंडिया रँक 212 (जनरल ईडब्लूएस रँक 17 ) मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे . फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षेत 99.99 % गुण प्राप्त झाले होते . ऑल इंडिया रँक 190(जनरल ईडब्ल्यूएस रँक  16) मिळवले होते . या परीक्षेत फिजिक्स या विषयात 100 पैकी 100 मार्क मिळाले होते . किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY SX) या परीक्षेत सुद्धा त्याची ऑल इंडिया रँक  342 इतकी प्राप्त झाली होती . बारावी बोर्ड च्या परीक्षेत 96% मार्क मिळाले आहेत . पहिली ते दहावी हृषीकेशचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल वाघळवाडी येथे झालेले आहे .  11 वी व 12वी सोबत जेईई ची तयारी बारामती येथील चैतन्य अकॅडमी येथे केली . भारतातील यूपीएससी व जेईई ऍडव्हान्स ह्या दोन परीक्षा सर्वात अवघड व प्रतिष्ठित समजल्या  जातात . या परीक्षेत हृषीकेश जेधे याने   जे अभूतपूर्व यश प्राप्त केले त्यामुळे वाणेवाडी, सोमेश्वरपरिसर व बारामती मधून कौतुक होत असून त्याचे अभिनंदन केले जात आहे .

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.