मुस्लिम बांधवांची दिवाळी यंदाही “ गोड ”
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ-जातीय सलोखा जपण्याहेतू सालाबादप्रमाणे यंदाही वाल्हे (ता.पुरंदर) येथील मुस्लिम बांधवांना आमदार संजयजी जगताप मित्र परिवारातर्फे दिपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले आहे.
वाल्हे येथील शाही सुन्नी मस्जिदीच्या प्रांगणात कॉंग्रेसच्या नीरा कोळविहीरे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष अॅड.विजयजी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत गण प्रमुख दत्तात्रेय शिंदे यांसह त्रिंबक माळवदकर बाळासाहेब भुजबळ नाना दाते मदन भुजबळ मोहनराव ढोबळे तसेच वाल्हे पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप समीर हिरगुडे आदी मान्यवरांच्या हस्ते येथील मुस्लिम बांधवाना दिपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले आहे .तर पुरंदर हवेलीतील जवळपास तीन हजार मुस्लिम कुटुंबांना देखील आमदार संजयजी जगताप मित्र परिवारातर्फे घरपोच फराळ देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अल्प संख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान व रफिक भाई शेख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी समता व बंधुता या विचारांनी प्रेरित झालेल्या मुस्लिम बांधवांनी कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांची गळा भेट घेऊन दिपावली महोत्सव उत्साही वातावरणात साजरा केला.
याप्रसंगी मौलाना शकील शेख यांसह शाही सुन्नी मस्जिद व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष असलम पठाण चांदभाई शेख इकबाल आतार अमर तांबोळी तसेच शौकत शेख असलम नदाफ अक्रम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.