निधन वार्ता;महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे निधन.
मुंबई, दि. 1 :- "महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ॲड. अरविंद चव्हाण यांच्या निधनानं सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीतलं ज्येष्ठं, कर्तबगार व्यक्तिमत्वं हरपलं आहे. सातारा जिल्ह्यानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या विचार, कार्य, नेतृत्वावर निष्ठा ठेवून लोकसेवेला वाहून घेतलेलं नेतृत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. अरविंद चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.