माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी
पुरंदर : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील अनेक निराधार व गरीब कुटुंबे हि अशा आनंदापासून नाईलाजास्तव दूर असतात मात्र या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा ,त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी ग्रामीण भागातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती देखील सरसावल्या आहेत त्यामुळेच अनेकांची दिवाळी आनंदमय झाली आहे.
पिंपरे खुर्द ( ता.पुरंदर ) येथील थोपटेवाडीत बीड, मालेगावहून आपल्या कुटुंबासमवेत उस तोडण्याकरिता आलेल्या उसतोड कामगारांच्या पालात दिवाळीचा सण साजरा होत नाही. परंतु त्यांच्या पालातही दिवाळी साजरी होऊन त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसला पाहिजे या उदात्त हेतूने बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी पुढाकार घेत येथील असंख्य कुटुंबांना दिपावली निमित्त ‘ कलकत्ता मिठाई ’ चे वाटप केले. यावेळी उसतोड कामगारांच्या कुटुंबामध्ये दिवाळी सणाचा गोडवा निर्माण झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते .
या स्तुत्य उपक्रमात राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव पिंपरे गावचे माजी सरपंच प्रमोद थोपटे तसेच अभय थोपटे स्वप्नील रणनवरे हर्षद थोपटे नितीन साळुंखे नवनाथ भोसले प्रशांत खरात मिलिंद साळुंखे विशाल भोसले प्रथमेश साळुंखे हेमंत थोपटे तसेच पंचक्रोशीतील युवा वर्गाने देखील सहभाग घेतला होता.