माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांना करंजेपुल सरपंच यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा.
सोमेश्वरनगर - राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसो हे नेहमीच बारामती करांसाठी आदराचे व प्रेरणादायी स्थान आहे असे असताना दीपावलीनिमित्त त्यांना भेटून शुभेच्छा देण्याचा मोह सर्वांनाच होत असतो असे असताना गुरुवार दिनांक 4 रोजी नियोजित असणाऱ्या दौरा दरम्यान करंजेपुल सोमेश्वरनगर ठिकाणी निरा मार्गे बारामती कडे पवार साहेबांचा दौरा जात असताना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचा मोह करंजेपुल ग्रामस्थ व परिसरातील मान्यवर नागरिकांना झाला व सर्वसामान्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पवार साहेब हेही करंजे पूल येथे थोड्यावेळ थांबत दीपावलीच्या शुभेच्छा स्वीकारल्या व उपस्थित मान्यवरांनाही शुभेच्छा दिल्या.
करंजेपुल येथे पवार साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेले मान्यवर.
या प्रसंगी पवार साहेबांना शुभेच्छा देताना करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड, करंजेपुल वि का सोसायटीचे माजी चेअरमन कैलास मगर ,सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड ,बाळासाहेब चौधरी आरोग्य कर्मचारी समीर मुलानी ,पत्रकार विनोद गोलांडे सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.