'सोमेश्वर' ची बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी फुलली
सोमेश्वरनगर , साडेतीन मुहूर्तांपैकी एक... पाडवा अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
दिवाळी सणातील मुख्य सण म्हणजे लक्ष्मी पूजन व पाडवा यासाठी व्यवसायिक,व्यापारी वर्ग व घरांना झेंडूच्या फुलांची सजावट करण्यासाठी झेंडूचे फुले आकर्षित व सुशोभित दिसतात त्यामुळे झेंडू खरेदी करण्यासाठी बारामतीतील सोमेश्वरनगर येथील करंजेपुल बाजारपेठ ग्राहकांनी चांगलीच फुलली होती तरी शेतकरी व व्यापारी वर्गाने झेंडू हे पीक केले असून दसऱ्याला ते चांगल्या भावात विकले गेले त्यांनी ते समाधानी होते परंतु दिवाळी सणानिमित्त याच झेंडू फुलांची घसरण झाल्याने शेतकरी व व्यापारी वर्ग थोडासा नाराज झाला आहे तरी झेंडू पिक उत्पन्नमध्ये झालेला खर्च मिळत थोडीफार रक्कम नफा स्वरूपात शिल्लक राहणार असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गानी यांनी बोलताना माहिती दिली.
दरवर्षी दिवाळी सणाला मी झेंडूच्या फुलांची घराला सजावट करतो , यावर्षी झेंडू ला कमी दर असल्याने घराला आकर्षित सजावट करणार आहे.
...दत्तात्रय साळुंखे..