Type Here to Get Search Results !

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
बारामती :  इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सौ.रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार,  उद्योजक बाबा कल्याणी, विजय शिर्के,  दिपक छाब्रिया, प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.


 ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे  बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर  उभारण्यात आले आहे. विविध राज्यस्तरीय वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थामध्ये शालेय विद्यार्थ्यांना नेऊन त्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढविणे, योग्य शैक्षणिक दिशा देणे, विज्ञान सोपे आणि सहज करुन शिकवता येईल अशा प्रयोगासाठी उपयुक्त कीट विविध शाळांमध्ये वाटप आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना सोबतच व्यासपीठ , संशोधनाकडे वळविणे यासाठी या केंद्रांच्या माध्यमातून काम होणार आहे. 


 मुलांमध्ये कौशल्य विकसन व्हावे या दृष्टीने आभासी माहिती  तंत्रज्ञान, रोबोटिक्स तंत्राचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अनुभव घेण्याची सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध आहे.   विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देखील विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test