Type Here to Get Search Results !

"रणरागिणी प्रतिष्ठान"ग्रुप चर्चेत नसलेले किल्ले बनवतात; इतिहास लोकांपर्यंत पोहचावा तर यावर्षी सुंदरगड (दातेगड) ची साकारली प्रतिकृती

"रणरागिणी प्रतिष्ठान"ग्रुप चर्चेत नसलेले किल्ले  बनवतात; इतिहास लोकांपर्यंत पोहचावा तर यावर्षी सुंदरगड (दातेगड) ची साकारली प्रतिकृती
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर सावंत वस्ती येथील  रणरागिणी प्रतिष्ठान यांनी सुंदरगड (दातेगड)  ची प्रतिकृती साकारली असून तो हुभ नक्षीदार किल्ला बनवला आहे  तर कौतुकाची बाब म्हणजे हा किल्ला फक्त   मुलींनीच बनवला आहे.

  "रणरागिणी प्रतिष्ठान" मधील किल्ला बनवणाऱ्या सर्व मुलींच आहे त्यांनी एकत्र दिवसरात्र परिश्रम घेत हा किल्ला  हुबेहूब बनवल्याने त्यांचे कौतुक सोमेश्वर नगर परिसरातून होत आहे व हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील किल्ला प्रेमी व विविध किल्ला स्पर्धकही गर्दी करत आहेत व त्यांच्या कलेची दाद देत त्यांचे किल्ल्या सोबत फोटो सुद्धा कडतात. 

   हा किल्ला तयार करण्यासाठी  रुचिता सावंत, साक्षी सावंत, प्राची करळे,रिद्धी दडस ,श्रावणी मोरे, आकांशा बनसोडे, तनिष्का करळे, सिद्धी दडस, साक्षी सावंत, माधवी नरुटे, प्रचिती बाजारे, काव्या कदम यांनी परिश्रम घेतले.

 "रणरागिणी प्रतिष्ठान"या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे मागील एक वर्षापासून चर्चेत नसलेले किल्ले बनवणे आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे आहे, तसेच ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या मेहनतीने सुंदर गड हा किल्ला बनवला आहे आणि त्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला आहे. सामाजिक संदेश मधून गडावरील प्रत्येक पॉईंट ची माहिती त्यांनी त्यामध्ये दर्शवलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने गडाची रेखाकृती तयार करून गडाची उभारणी केली आहे.हा गड बनवण्यासाठी त्यांना आठ ते दहा दिवस लागले आहेत.
 "रणरागिणी प्रतिष्ठान" ग्रुप यांचा मागील वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि त्यांच्या गेल्या वर्षीच्या दिवाळी किल्ले स्पर्धेमध्ये  पहिला क्रमांक मिळवला असून या भाग घेतलेल्या किल्ला स्पर्धेत त्यांना प्रथम मिळणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test