...त्या मुलांनी साकारली किल्ले तोरणाची प्रतिकृती.
सोमेश्वरनगर - बारामतीतील वाणेवाडी येथे किल्ले तोरणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती कु.शिवम चंद्रशेखर भोसले तसेच कु .अनुराग किसन सावंत यांनी साकारली आहे.
गड किल्ले बनवण्याचा त्यांचं हे दुसरंच वर्षे आहे. गेल्या वर्षी त्यानी रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून साद संवाद स्वच्छता यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धत द्वितीय तर आधार सोशल फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धत उत्तेजनार्थ बक्षीस मिळून विशेष लौकिक मिळवला होता. याही वर्षी तोरणा किल्ला साकारून त्यांनी गड किल्ले संवर्धन व गडाची स्वच्छता हा सामाजिक संदेश देऊन शिवछत्रपतीचा इतिहास पुन्हा एकदा उजळला आहे. पंचक्रोशीतील सर्व बाल मावळे तसेच तरुण मुलांनी आवर्जून पहावा असा हा किल्ला आहे.