सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, वाकी, चोपडज, कानाडवाडी या विद्यालयात सन २०००-२००१ च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.एन. भंडलकर, प्रमुख पाहुणे निवृत्तशिक्षक के.जी. जगताप तसेच माजी विद्यार्थी शरद भोसले उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास २५००० रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
उपस्थितांचे विद्यालयाच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी श्रीफळ, गुलाबपुष्प व फेटा बांधून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी माजी विद्यार्थी चंद्रकांत कडाळे, अजित गायकवाड, लहू लोणकर, सचिन शेलार, धनंजय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बॅचचे वर्गशिक्षक शेंडकरसर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक इनामदार सर यांनी तर सूत्रसंचालन आर.एम. कुतवळ, डी वाय तांबोळी, पी.बी.जगताप, माजी विद्यार्थी डॉ. रवींद्र जगताप यांनी केले तर आभार ए. एस. फरांदे यांनी मांडले. माजी विद्यार्थी डॉ. रवींद्र जगताप व मित्र परिवार यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे, निखिल नाटकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.