मु. सा. काकडे महाविद्यालयात covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न
सोमेश्वरनगर - येथील मुसा काकडे महाविद्यालय, सोमेश्वर नगर, आरोग्य सेवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, आय. क्यू. ए. सी. विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, 10 फाटा,
यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित
covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले या प्रसंगी
मु. सा. काकडे महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व बांधकाम विभागाचे सभापती आदरणीय श्री प्रमोद काका काकडे देशमुख यांचे शुभहस्ते आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नव निर्वाचीत संचालक व मु.सा. काकडे महाविद्यालयाचे संचालक आदरणीय श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर मनोज खोमणे,
महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरीसर
महाविद्यालयाचे सहसचिव आदरणीय श्री सतीश लकडे सर
यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
या शिबिरामध्ये 18 वर्षावरील महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील अनेक नागरिकांनी या प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीरामध्ये येऊन लस घेतली.
पुणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाने अत्यंत मनोभावे सेवा करून आणि परिश्रम घेऊन covid-19 या रोगाचा प्रतिकार केला आणि समाजाची एक वेगळी सेवा करण्याचा आदर्श निर्माण केला.
असे गौरवोद्गार आदरणीय श्री प्रमोद काका काकडे -देशमुख यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयांच्या माध्यमातून अशाच प्रकारे शिबिरांचे आयोजन करून आरोग्यविषयक काळजी घ्यावी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक निरोगी राहावेत अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या. या कार्यक्रमासाठी वाघळवाडी समुपदेशक वैद्यकीय अधिकारी सौ योगिता माळी, परवेज मुलानी आकाश घाडगे तसेच महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागीय समन्वयक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा जवाहर चौधरी आणि आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जनसेवा संस्थेचे स्वयंसेवक आणि प्राध्यापक प्रवीण जाधव, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले