सावित्रीबाई फुले विद्यापीठ आयोजित स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी- बारामतीतील विद्या प्रतिष्ठान
चे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सी .बी .एस .ई. सोमेश्वरनगर (वाघळवाडी)येथील इ. ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय औषधीवनस्पती मंडळ तसेच आयुष मंत्रायाल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वकृत्व स्पर्धेत
सहभाग घेतला होता. यामध्ये 'आयुर्वेद निरोगी जीव
नाची गुरूकिल्ली' या विषयावर वकृत्व सादर केले
यामध्ये इ. १० वी तील चतुर्वेदी अनन्या ब्रिजमोहन' हिने हिंदी भाषा विभागतून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी तिला रोख रक्कम
३०००/- रू . प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले.इ.६
वी तील‘भोसले स्वरा अजित' हिने इंग्रजी भाषा विभा
गातून तृतीय क्रमांकपटकावला. तिला रोख रक्कम २०००/- रू. प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेसाठी अनन्याला शाळेतील हिंदी विषय शिक्षिका सारिका काकडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
तसेच स्वराला शाळेतील इंग्रजी विषय शिक्षिका प्रिती जगताप यांचे मार्गदर्शन लाभले .यावेळी शाळेचे
प्रा. सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्यानींचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.