पुरंदर : नाविन्यपुर्ण व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि भविष्यकाळात मिळणारा वाव या व्दिगुणी सुत्रातुनच उद्योजक पुढे आले आहेत त्यामुळे बदलत्या काळाची पाऊले ओळखत तरुणांनी व्यावसायिक होणे तितकेच गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून उभारलेल्या पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील "किगा आईस्क्रीम पार्लर " चे उद्घाटन अशोकभाऊ टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले व्यवसाय लहान अथवा मोठा असला तरी त्यामध्ये सातत्याने कार्यरत राहिल्यास यशस्वी उद्योजक होऊ शकतो.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुदामराव इंगळे यांसह सुरेश अण्णा घुले बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे तसेच तुकाराम कुंजीर, सनी काळभोर, अजय भोसले, नागेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन तुपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आईस्क्रीम पार्लर चे मालक ज्ञानेश्वर काळभोर यांनी मानले.