सोमेश्वरनगर ! पोलीस विरूध्द पत्रकार संघात पोलिसांची पत्रकारावर मात ...
(सोमेश्वर ला रंगला क्रिकेट चा सामना )
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
रोजचा ताणतणाव... सततची धावपळ.. यातुन विरंगुळा तर झालाच पाहीजे मात्र शारीरिक क्षमतेची पण माहीती व्हावी या हेतुने बारामती तालुक्यातील पत्रकार व वडगाव निंबाळकर पोलीस यांच्यात गेले 5 वर्ष सोमेश्वर येथील मु सा काकडे (ता बारामती) महाविद्यालयाच्या प्रांगणात सामने होत असतात तर दि 31 रोजीरविवार च्या
सुट्टीत झालेल्या पोलीस विरुद्ध पत्रकार सामन्यात पत्रकार संघांनी पोलीस संघावर 66 धावसंख्येचे आव्हान ठेवले तर पोलीस संघांनी उद्धिष्ट पूर्ण करत विजय मिळविला .
आज वडगाव निंबाळकर पोलीस संघ आणि बारामती तालुका पत्रकार संघात यांचा मु सा काकडे महाविद्यालय मैदानावर क्रिकेट सामना पार पडला,
वडगांव निंबाळकर पोलिस आणि बारामती ग्रामीण पत्रकार संघाचा पाच वर्षांपूर्वी सुसंवाद घडावा यादृष्टीने पोलिस पत्रकार सामने पाच वर्षांपूर्वी सुरू केले. आज पाचव्या वर्षीच्या सामन्यात पोलिस व पत्रकार दोन्ही संघाचे कर्णधार यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरले. पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पत्रकार संघांनी 66 धावांचे आव्हान उभे केले. पोलिसांनी सहज फलंदाजी करताना सहज विजय प्राप्त केला. दुसर्या सामन्यात पोलिसांच्या संघाने 110 धावांचे आव्हान ठेवले ते आव्हान स्वीकारत पत्रकार संघाने लढत दिली परंतु तो त्यांचा निसटता विजय झाला.
उत्कृष्ट झेल घेऊन सामना म्हणून तुषार जैनक यांना एक ट्रॉफी प्रदान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली
या नियोजित क्रिकेट सामना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करंजेपुल दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सुपा पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, माळेगाव पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, नितीन बोराडे, अक्षय सिताप,मेजर साळुंखे,अमोल भोसले,शेंडकर साहेब, तसेच जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, काशीनाथ पिंगळे,वसंत मोरे, चिंतामणी क्षीरसागर, तुषार धुमाळ,युवराज खोमणे, हेमंत गडकरी,विनोद गोलांडे, अमर वाघ, सचिन वाघ, सचिन पवार,सुनील जाधव इ.उपस्थित होते.
क्रिकेट सामन्याचे निवेदक अतिशय उत्कृष्ठ निवेदक म्हणून मनोहर तावरे यांनी मांडले तर दोन्ही संघाचे सामना खेळताना मनोबल वाढवले.