मु. सा. काकडे महाविद्यालयात दुर्मिळ फोटो प्रदर्शन
सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मागील पन्नास वर्षातील महाविद्यालयीन इतिहास, घटना, अनोखे प्रसंग यावर आधारित दुर्मिळ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनामध्ये 1972 ते 2021 या कालावधीतील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, विविध उपक्रमांच्या छायाचित्रांच्या दुर्मिळ फोटोंचा प्रदर्शनामध्ये समावेश होता. सुमारे 500 हून अधिक फोटोंच्या माध्यमातून सुवर्णमहोत्सवी वर्षात जुन्या आठवणी, गत स्मृतींना उजाळा मिळाला. या दुर्मिळ फोटो प्रदर्शनाचे अभिजीत काकडे देशमुख, नवनिर्वाचित संचालक, श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख, सचिव. प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय घाडगे, नितीन कुलकर्णी, गुलाबराव गायकवाड, प्रा. महेंद्रसिंहराजे जाधवराव, प्रा. शिवाजीराव शिंदे,
विलास बोबडे, बाळासाहेब जगताप, भीमराव बनसोडे, धोंडीराम आगवणे, ऋषिकेश धुमाळ, संकेत जगताप, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजू जाधव, सौ. सुजाता भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. दुर्मिळ फोटो प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ नारायण राजुरवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. यासाठी प्रा. रजनीकांत गायकवाड, प्रा. डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. कुलदीप वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.