दिवाळीनिमित्त ' सोमेश्वर' ची बाजारपेठ सजली...
सोमेश्वरनगर : अवघ्या दोन दिवसांवर म्हणजे एक तारखीपासून दिवाळी येऊन ठेपली असून श्री सोमेश्वर पंचवार्षिक निवडणुकीच्या गडबडीतून बाहेर पडलेल्या नागरिकांनी बारामतीतील सोमेश्वरनगर च्या मुख्य बाजारपेठ येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी विविध दुकानांनी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. बोनस हाती पडताच कामगार सहज खरेदीला बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर सोमेश्वर येथील बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच सोमेश्वर करखाना गळीत हंगाम चालू झाल्याने या बाजारपेठ मध्ये चांगलीच भर पडली आहे. कारखाना परिसर तसेच मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारले आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर या बाजरपेठ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर सोमेश्वर बाजरपेठत मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.
......
रेडिमेड फराळाला मागणी...
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दिवाळी आल्याने गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणा-यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे.
...
यामध्ये परिसरातील स्वीट होम, हॉटेल व दर वर्षी गरगुती दीपावली फराळ व्यवसाय करणाऱ्यानी डिजिटल चा आसरा घेत आपली जाहिरात देत आपल्या व्यवसायाचा फायदा घेण्याचे ठरवले व त्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच दिवाळी पदार्थ देण्यास पसंदी दिली आहे.