सोमेश्वरनगर येथे माजी कर्मचारी मेळाव्याचे आयोजन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी: सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 3 महाविद्यालयात सन 1972 ते 2021 या काळामध्ये सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्नेहमेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा जयवंतराव घोरपडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य श्री संजय घाडगे, श्री. बाळासाहेब जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक अभिजीत काकडे देशमुख ,
ऋषिकेश धुमाळ, प्रा. आनंद गोसावी, प्रा. शिवाजीराव शिंदे, प्रा. महेंद्रसिंहराजे जाधवराव, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजू जाधव, सहसचिव सतीश लकडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. दत्तात्रय डुबल यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत तर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी केले . त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक आगळावेगळया सोहळ्याचे आयोजन केले आहे असे सांगितले . नव्या-जुन्या अनुभवांची देवाण- घेवाण होऊन विचारांना चालना मिळते, अधिकाधिक विकासाला गती मिळते असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव जयवंतराव घोरपडे यांनी नव्या जुन्या आठवणी सांगून मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनोग ते व्यक्त
केली. यामध्ये श्री. सुभाष मोरे, बाळासाहेब जगताप, प्रा. नारायणराव खटके, प्रा. आनंद गोसावी, प्रा. शिवाजी साळुखे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली माजी कर्मचारी स्नेहमेळाव्याचे यशस्वी
आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहमेळावा संयोजक प्रा. डॉ. दत्तात्रय डुबल यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. रवींद्र जगताप यांनी केले तर प्रा. डॉ. नारायण राजुरवार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ.प्रवीण ताटे देशमुख, प्रा. रजनीकांत गायकवाड, प्रा. मेघा जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.