सोमेश्वरनगर येथे माजी प्राचार्य डॉ.सोमप्रसाद केंजळे स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. माजी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आणि कार्याचे स्मरण व्हावे या हेतूने हे केंद्र उभारण्यात आले आहे . महाविद्यालयातील होतकरू, हुषार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राद्वारे परिसरातील विद्यार्थ्यां ची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे . त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रप्रमुख डॉ. नारायण राजूर वार यांनी दिली .सदर स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .
त्यांनी या प्रसंगी स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षा केंद्राचा लाभ घेऊन यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, शिक्षकांनीही विशेष परिश्रम घ्यावेत असे प्रतिपादन केले व डॉ. सोमप्रसाद केंजळे (सर)प्रथम पुण्यस्म रणाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा . जयवंतराव घोरपडे, सोमेश्वर साखर कारखाना(ता बारामती) नवनिर्वाचित संचालक अभिजीत काकडे-देशमुख, लालासाहेब नलावडे, सहसचिव सतीश लकडे, प्राचार्य जवाहर चौधरी, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय घाडगे, नितीन कुलकर्णी, गुलाबराव गायकवाड, प्रा. महेंद्रसिंहराजे जाधवराव, प्रा. शिवाजीराव शिंदे, प्रा. विलास बोबडे, बाळासाहेब जगताप, भीमराव बनसोडे,धोंडीराम आगवणे, ऋषिकेश धुमाळ, संकेत जगताप, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजू जाधव ,सुजाता भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. प्रवीण ताटे देशमुख, डॉ. जया कदम, प्रा. रजनीकांत गायकवाड, प्रा. मेघा जगताप, प्रा. रवींद्र जगताप आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. दत्तात्रय डुबल, माजी विद्यार्थी अजित घोरपडे यांनी विशेष सहाय्य व परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले तर आभार या स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. नारायण राजुरवार यांनी मानले.