कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील - उपाध्यक्षपदी भरत शहा यांची निवड
इंदापूर:महात्मा फुलेनगर- बिजवडी (ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शुक्रवारी (दि.29 ) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी भरत शहा यांची निवड करण्यात आली.
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर आज कारखान्याच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष पदासाठी भरत शहा यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांनी केली. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, देवराज जाधव, कांतीलाल झगडे, सत्यशील पाटील, रघुनाथ राऊत, संजय देहाडे, महेंद्र रेडके आदी उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी स्थापन केलेले हे सहकाराचे मंदिर आहे. कर्मयोगी कारखाना ही तालुक्याची मातृसंस्था आहे. इंदापूर तालुक्यामधील समाजातील सर्वच घटकांचा विकास हा कर्मयोगी व इतर सहकारी संस्थांमुळे झाला आहे. तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक प्रगतीमध्ये कर्मयोगी कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे. कारखान्याचे कामकाज राजकारणविरहित चालवण्यात येईल. कर्मयोगी कारखान्याचा अडचणीचा काळ आता संपत आला असून कारखाना पुन्हा वैभव प्राप्त करेल यात शंका नाही. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पद्माताई भोसले, आप्पासाहेब जगदाळे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. चालु गळीत हंगामात कारखाना साडे बारा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
याप्रसंगी नूतन संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, शारदा पवार, कांचन कदम, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
_______________________________
फोटो: - कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना आप्पासाहेब जगदाळे. छायाचित्रात उपाध्यक्ष भरत शहा व मान्यवर.