रक्तदान शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे - भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांचे आवाहन l
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून पोलीस प्रशासनाने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून भारतीय पत्रकार संघ या शिबिरात ताकतीने सहभागी होणार असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या अभिनव संकल्पनेतून रक्तदान शिबिरांचे आयोजन पोलिस प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. मागील आठवड्यात बारामती शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सोळाशेहून अधिक रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या होत्या.
उद्या दि. २२ सप्टेंबर रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रक्तदान शिबिर पार पडणार असून वडगाव निंबाळकर, पणदरे, करंजे, मोरगाव, सुपे या ठिकाणी असलेली पोलिस दुरक्षेत्रे तसेच मोरगाव पळशी रस्त्यावरील सिधदीविनायक मंगल कार्यालय या ठिकाणी एकाच वेळी हे शिबिर पार पडणार असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे.
पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला भारतीय पत्रकार संघाने प्रतिसाद दिला असून संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांनी या शिबिरात पत्रकार बांधव सहभागी होणार असून जास्तीत जास्त लोकांनी ०२११२- २७२१३३ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.