Type Here to Get Search Results !

वाल्हेत टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाचे आगमन

वाल्हेत टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाचे आगमन
पुरंदर तालुका प्रतिनिधी...
रामायणाचे रचिते महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे नगरीत लाडक्या गणरायाचे टाळ मृदुंगाच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाने मांगल्यपूर्ण वातावरणात आगमन झाले.
कोरोना काळात शासन नियमांचे पालन करत वाल्हे पंचक्रोशीतील सावतामाळी तरुण मंडळ ,एकता मित्र मंडळ ,शिवशक्ती प्रतिष्ठान, हनुमान तरुण मंडळ, राजे उमाजी नाईक मित्र मंडळ, नवयुग तरुण मंडळ ,भैरवनाथ मित्र मंडळ, अमर तरुण मंडळ,शिवराय तरुण मंडळ  अशा विविध सार्वजनिक मित्र मंडळांसह गणेश भक्तांकडून गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे .
या दरम्यान सावतामाळी तरुण मंडळ व महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने संपूर्ण वाल्हे नगरी बाप्पामय झाली होती.
यावेळी संपूर्ण जगातून कोरोनाचा नायनाट होऊ दे अशीच प्रार्थना वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांसह सामाजिक कार्यकर्ते सागर भुजबळ महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.अशोक महाराज पवार, दिपक महाराज पवार, पांडुरंग पवार अभिजित दुर्गाडे सुदाम भुजबळ जयराम पवार विनायक सुतार आदी मान्यवरांसह गणेश भक्तांनी गणरायाकडे केली .      
तर अनेक सार्वजनिक मंडळांकडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बाप्पांची अनंत चतुर्थी पर्यंत पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test