'श्री सोमेश्वर वाचनालय'ची ४१ वी वार्षिक सभा संपन्न...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील गेले 41 वर्ष सोमेश्वरनगर परिसरात वाचन चळवळ व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कार्यरत असलेल्या 'श्री सोमेश्वर वाचनालय' ची वर्ष ४१ वी (२०२०-२१) वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत शनिवार दि ४ रोजी सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे संपन्न झाली, या प्रसंगी अध्यक्ष कल्याण जगताप व प्राचार्य एस पी जगताप, मु.सा.काकडे महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पुजनाने प्रारंभ करण्यात आला.
तसेच कार्यक्रम वेळी ज्यांनी सर्वांना प्रेरणा देणारे कै. प्रा.डॉ. सोमप्रसाद केंजळे व विद्यालयाचे शिक्षक कै. आर के पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच म.सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नारायण राजुरवार यांना पी.एच.डी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला , वाचनालयाचे कोषाध्यक्ष डॉ.एस पी जाधव यांनी प्रास्ताविक मध्ये वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला , कार्यवाहक उदयसिंग जगताप , उपकार य वाह रवींद्र होळकर , संचालक डॉ. अजय दरेकर, कार्याध्यक्ष अनिल निगडे, ग्रंथपाल देविदास काळखैरे यांनी बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली...तर अध्यक्षीय मनोगतात कल्याण जगताप यांनी सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कै सोमप्रसाद केंजळे यांच्या संयोगातून सोमेश्वर वाचनालयाची सुसज्य इमारत उभारण्यास मोलाचे सहकार्य लाभले तर वाचनालय डिजिटल सरूपात अवतरत पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. सदर वार्षिक सभेस काकडे महाविद्यालय व सोमेश्वर विद्यालयाचे आजीव सदस्य स्टाफ उपस्थित होता तसेच संचालकअनिल भोसले , स्वीकृत तज्ञ संचालक प्रविण काळे आदी उपस्थित होते. सहाय्यक ग्रंथपाल सुभाष मोरे कर्मचारी अजित जगताप , हरिश्चंद्र सावंत यांनी सभेचे आयोजन केले तर उपस्थितांचे आभार डॉ.अजय दरेकर यांनी मानले