महिला रुग्णालय बारामती येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बारामती : पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक रक्त केंद्र बै.ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या मार्फत आज बारामती शहरात महिला रुग्णालय, येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, तहसिलदार विजय पाटील, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, ग्रामिण रुग्णालय रुईचे डॉ. सुनिल दराडे, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील रक्त पेढी प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर, रक्त संकलन अधिकारी डॉ. गौरव देखमुख, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण बर्डे रेसिडेंट डॉक्टर डॉ. अनामिका सोमावार, डॉ. स्मिता गवळी व तंत्रज्ञ, सहायक, बीपीएमटी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबीरास बारामती तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तिस सामायिक स्वैच्छिक रक्तदान कार्ड देण्यात आले. रक्तदान शिबीरात 92 इतक्या रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या.