बारामती तालुक्यामध्ये अवैध्य गौण खनिज उत्खनना विरोधात घंटानाद आंदोलन;कारवाई नाही केली तर त्याच खाणीमध्ये आत्मदहन करण्याचा आंदोलकांचा इशारा.
बारामती प्रतिनिधी
खामगळवाडी (ता.बारामती) येथील खाणीतून होत असलेल्या कथीत अवैध्य गौण खनिज उत्खनना विरोधात पणदरे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या अवैध्य खाणी बंद होऊन आत्तापर्यंत जे बेकायदेशीर उत्खनन केले गेले त्याची चौकशी होऊन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने वसूलपात्र फौजदारी होऊन पाच पट दंड वसूल करणे अपेक्षित असतांना शासकीय अधिकारी संबंधीत ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप कोकरे यांनी केला. तसेच या खाणीमुळे शेतकरी व स्थानीकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन विहीरीच्या रिंगा खराब होणे, शेतपिकांवर फुफूटा बसणे, घराला भेगा पडत असल्याचे यावेळी कोकरे व ग्रामस्थांनी सांगीतले.तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकरनात लक्ष घालून लोकांना न्याय मिळवून देतील ही अपेक्षा व्यक्त केली. सदर प्रकरणातील संबंधीतांवर कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. पणदरे येथून हा पायी मोर्चा खामगळवाडी येथील खाणीपर्यंत काढण्यात आला. या आंदोलनात तालुक्यातील अनेक गावातुन समर्थक सहभागी झाले होते. तसेच आंदोलनस्थळी व आसपासच्या परिसरात पोलिसांनी पुर्ण ताकदीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
- शासकीय अधिका-यांनी आर्थीक हितसंबंध जोपासत सदर बाबीकडे दूर्लक्ष केल्याने पर्यावरणाचा मोठा -हास होऊन शासनाचे करोडो रुपयांचे नूकसान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी बडतर्फीची कारवाई व्हावी. व संबंधीतांवर कारवाई व्हावी सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास याच खाणींमध्ये आत्मदहन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते कोकरे व सहकारी आंदोलकांनी दिला आहे.