नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ; पहा लागणारी सर्व माहिती.
दि.९ आॕगस्ट २०२१ पासून ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी १ जानेवारी २०२२ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरिय अधिकारी [B L O] यांच्याकडे संपर्क साधावा.
🛑 नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे
➡️ घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
➡️ घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३)२ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला
🔵संपर्क🔵
आपल्या गावातील वार्डनुसार बीएलओ
➡️ अंतिम मुदत - 30/09/2021
टीप--१ जानेवारी २०२२ ला आपले वय १८ वर्ष पाहिजे असे सर्व स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र
मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत
"चला मतदार होवू या,लोकशाही प्रबळ करु या"