पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित,चिंचवड येथील नूतन वास्तूचे उद्घाटन*
पुणे, पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी तसेच शहराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, चिंचवड येथील नूतन वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार तथा बँकेचे अध्यक्ष गजानन बाबर,बँकेचे उपाध्यक्ष मधुकर बाबर, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, शाम लांडे, बँकेच्या संचालक मंडळातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँक बाबर कुटुंबियाने मोठया कष्टाने उभी केली आहे. बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू आहे. जनतेचा बँकेतील पैसा कष्टाने कमावलेला असतो. कष्टाने कमावलेला पैसा विश्वासाने बँकेत ठेवी स्वरूपात ठेवला जातो. जनतेच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात येऊ नये.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष मधुकर बाबर यांनी केले. तर संचालक रमेश वाणी यांनी आभार मानले.