श्रावणातील शेवटच्या सोमवारी असणारा सोमेश्वर महाराज पालखी सोहळा भाविका विना...
श्रावण महिन्यात दर वर्षी साधारण चौथ्या सोमवारी श्रावणाचा शेवटचा सोमवार असतो परंतु यावर्षी तब्बल पाच वर्षांनी श्रावणातील शेवटचा सोमवार हा पाचव्या सोमवारी आल्याने या वर्षी श्रावणात पाच सोमवार आले आहे.
बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ प्रतिरूप मानले जाणारे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे आहे . दरवर्षी श्रावण महिन्यात सोमेश्वर करंजे येथे शिवभक्त हे विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येत दर्शनासाठी येत असतात परंतु या वर्षी कोरोणाच्या संकटामुळे शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्वच मंदिरे बंद असल्याने शिवभक्तांना श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग चे दर्शन न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
. शेवटच्या सोमवारी असणारा खोमणे भेट व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो परंतु या वर्षी हाच सोहळा पाव्हायला न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत सोमेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दर वर्षी प्रमाणे पण साध्या पद्धतीत पार पडला तसेच मध्यरात्री शिवलिंग विधीवत पुज्या पुरोहित ऋषिकेश घोलप व मुकेश भांडवलकर यांनी पुज्यारी विनोद भांडवलकर हस्ते पार पडली
तसेच मंदिर परिसरात पुष्प सजावट राजापुरी भेळचे जमीर शेख व महालक्ष्मी फ्लाय अँड फर्निचर बारामतीचे मयुर बोबडे यांनी सोमेश्वर महाराजांची पालखी , सभामंडप तसेच स्वयंभू शिवलिंग गाभारा तसेच परिसरात पुष्प विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली.
आज श्रावण सोमवारी सोमवती अमावस्या आल्या निमित्त सोमेश्वर महाराजांची निरा स्नान उपस्थित मानकरी व पुज्यारी यांनी वाजत गाजत निरा स्नान ला कोरोनाच्या नियम पळत सजवलेल्या चारचाकी मध्ये नेण्याचे आयोजन देवस्था ट्रस्ट ने केले होते , सकाळी नऊ वाजता नऊ वाजता उत्सव मूर्तीचे आगमन सोमेश्वर मंदिरात झाले त्यानंतर मी ठीक अकरा वाजता उत्सव मूर्तीचे पूजा अभिषेक अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर व बारामती उपविभागीय पोलिस अधीक्षक नारायण शिरगावक यांच्या हस्ते संपन्न होत पालखी प्रस्थान मोजक्याच खांदेकरी मानकरी व पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले दुपारी बारा वाजता श्रींच्या पालखीचे पालखी तळावर नित्याचे खोमणे मानकरी यांच्या हस्ते विविध पूजा आरती संपन्न झाली व मंदिराकडे पालखी सोहळाचे प्रस्थान करत या सोहळ्याची सांगता झाली..
सोमवार दिवशी दुपारी पडलेल्या पावसाने गारवा पसरला तर...संपूर्ण सोमेश्वर मंदिराला आलेले तेज सुबक होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व करंजेपूल दुरक्षेत्र चे उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. माहिती-देवस्थान अध्यक्ष प्रताप भांडवलकर ,सचिव राहुल भांडवलकर व खजिनदार सोमनाथ भांडवलकर यांनी दिली.
या सोहळ्याप्रसंगी करंजे ग्रामस्थ तसेच तालुक्यातील मोजकेच पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
सोमेश्वर चा खोमणे भेट पालखी सोहळा पाहण्यासाठी दर वर्षी करंजेगाव व परिसरात पाहुणे प्रत्येक घरी मोठ्या संख्येने येत असतात परंतु कोरोणाच्या संकटामुळे गेले दोन वर्ष हा सोहळा पाहायला न मिळाल्याने सर्वांनी खंत व्यक्त केली.
मा.तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड.
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे ट्रस्ट व वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत विविध जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्त भाविकांना दर्शनासाठी येऊ नये म्हणून दिलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला व नागरिकानो गर्दी ठिकाणी जाणे टाळावे व आपले कुटुंब व आपली काळजी घ्यावी अशी ही विनंती केली.
API- सोमनाथ लांडे.
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे भाविकांसाठी मंदिर कमान येथे बाहेरून स्वयंभू शिवलिंग चे भाविकांना दर्शन घेण्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था प्रदीप भगवानराव काकडे-देशमुख यांनी व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आणि काकडे यांचे आभारही मानले.