Type Here to Get Search Results !

अर्थपूर्ण व्यवहार न झाल्याने फीट असलेली ऑटो रिक्षा अन् फिट.....

अर्थपूर्ण व्यवहार न झाल्याने फीट असलेली ऑटो रिक्षा अन् फिट..... 
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षकाची मनमानी

बारामती- अर्थपूर्ण व्यवहार न झाल्याने फीट असलेली ऑटो रिक्षा अन् फिट केल्याची घटना बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतीच घडली. नियमानुसार ऑटो रिक्षाची सर्व प्रकारची पूर्तता केली असतानाही एका मोटर वाहन निरीक्षकाने सदर ऑटो रिक्षा अन् फिट असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या मोटर निरीक्षकाने ती रिक्षा तपासणी केली असता फिट असल्याचे सांगून योग्यता प्रमाणपत्र दिले.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. या ठिकाणाहून अनेक वाहन चालक, मालक वाहनांच्या विविध कामांसाठी येत असतात. मात्र येथील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण व्यवहार न झाल्यास अनेक वाहन चालक मालकांची अडवणूक केल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. वाहनांसंदर्भात सर्व नियमांची व कागदपत्रांची पूर्तता करूनही येथील एक मोटार वाहन निरीक्षक वाहन मालकांची अडवणूक करत असल्याचे बोलले जात आहे.

बारामती शहरातील नंदकुमार गायकवाड यांची ऑटो रिक्षा
MH-42-B-2259 ही योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी आली होती. रिक्षा चालक गायकवाड यांनी योग्यता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आरटीओ नियमानुसार रिक्षाची व कागदपत्रांची पूर्तता करून सदर रिक्षा तपासणीसाठी मेडद येथील ट्रॅकवर गेली होती. मात्र संबंधित मोटर वाहन निरीक्षकाने रिक्षा अन् फीट असल्याचे सांगितले. सदर रिक्षाचालकाने आपली ऑटो रिक्षा घेऊन थेट बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले. येथील वरिष्ठांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका मोटर वाहन निरीक्षकाला रिक्षाची तपासणी करण्यास सांगितले असता ती रिक्षा फिट असल्याचे सांगून योग्यता प्रमाणपत्र दिले.

सध्या कोरोनाच्या काळातही रिक्षाचालकांसह इतर वाहनचालकांचा व्यवसाय मंद आहे. अनेक रिक्षाचालक व वाहनधारकांवर अद्याप उपासमारीची वेळ सूरू आहे.असे असतानाही मुजोर मोटार वाहन निरीक्षकाच्या चिरीमिरी गोळा करण्यासाठी गोरगरीब रिक्षाचालकांची अडवणूक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित मोटर वाहन निरीक्षकाची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे वाहनधारकांनी सांगितले.

सकाळी मी माझी रिक्षा पासिंग करण्यासाठी साडेनऊ वाजता मेडद येथील ट्रॅकवर गेलो होतो. आरटीओ नियमानुसार रिक्षाची व कागदपत्रांची सर्व पूर्तता केली होती. तरीही येथील मोटर वाहन निरीक्षकाने माझी रिक्षा अन् फिट असल्याचे सांगितले. त्यानंतर मी आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी दुसऱ्या मोटर वाहन निरीक्षकाला रिक्षाची तपासणी करण्यास सांगितले. त्यावेळी रिक्षा फिट असल्याचे सांगून मला प्रमाणपत्र मिळाले.

नंदकुमार गायकवाड, रिक्षा मालक.

समंधित मोटार वाहन निरीक्षक यांना ज्ञापन देऊन चोकशी करण्यात येईल.
नंदकिशोर पाटील
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test