वाकी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती साधेपणात साजरी.
बारामतीतील वाकी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार उपस्थित मन्यावरच्या हस्ते अर्पण करून त्यांना वंदन केले तसेच त्यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देत लढा दिला असे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचं स्थान देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आणि देशवासीयांच्या हृदयात कायम राहील अशी भावना व्यक्त करत वाकी येथे राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले
अध्यक्ष स्थानी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे बारामती तालुका उपाध्यक्ष पै. नानासाहेब मदने होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे बारामती तालुका अध्यक्ष किसन तांबे ,उपाध्यक्ष प्रताप गायकवाड, श्री सोमेश्वर सेवभवी अध्यक्ष सुखदेव शिंदे ,जय मल्हार क्रांती संघटना तालुकाध्यक्ष हनुमंत खोमणे,जय मल्हार क्रांती संघटना महिंद्र भंडलकर, पांडुरंग गळगे, महेश खोमणे संतोष भंडलकर ,सोमनाथ मदने ,काका भंडलकर, भारतीय पत्रकार संघ उपाध्यक्ष विनोद गोलांडे होते .
तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती दरवर्षी वाकी ग्रामस्थ मोठ्या थाटात वाजत गाजत करत असतात परंतु या गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भाव व शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्वत्रच कार्यक्रम ,उत्सव साधेपणात साजरे करतात या अनुषंगाने वाकी(ता बारामती ) येथेही आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती अत्यंत साधेपणात साजरी केली.
या प्रसंगी वाकी सरपंच किसन बोडरे,सदस्य इंद्रजित जगताप, सुधीर गायकवाड,सुनीता जगताप,कल्पना जगताप,सामजिक कार्यकर्ते बापूराव गाडेकर उपस्थित होते.
जिल्हा प्राथमिक शाळा व वस्ती शाळा वाकी यांना आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक सुबक प्रतिमाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गाडे(गुरुजी) यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वाकी अध्यक्ष अनिल भंडलकर यांनी मानले.