सुहास उरवणे यांना 'जीवन गौरव' पुरस्कार
महाराष्ट्र राज्य विरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्वीकारताना सुहास उरवणे
महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने उपक्रमशील व आदर्श शिक्षक सुहास उरवणे यांना 'महात्मा बसवेश्वर जीवन गौरव' पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने सोलापूर येथे शिक्षक दिनी झालेल्या कार्यक्रमात खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निमगाव (म) कार्यरत असणारे शिक्षक सुहास उरवणे यांची एकूण 28 वर्षे सेवा झालेली असून त्यांनी शिष्यवृत्तीपरीक्षा, वक्तृत्व, कथाकथन लोकनृत्य, बालनाट्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. त्यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या 'नवी दिशा', 'चोरावर मोर', 'कायापालट' या बालनाट्यानी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तर'अक्षरदान' या एकपात्री प्रयोगाने समाजामध्ये जनजागृती केली. त्यांनी 'येणे वाग्यज्ञे तोषावे' ही पसायदानाचा अर्थ सांगणारी लेखमाला आणि 'योद्धा संन्यासी' हा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील लेख लिहीले आहैत. निमगावयेथील शाळेस जवळपास पाच लाख 28 हजार रुपये चा शैक्षणिक व सामाजिक कार्य करून विद्यार्थ्यांना मोफत टाय,बेल्ट, बूट ,सॉक्स देण्यामध्ये त्यांनी मोलाचा सहभाग उचलला. शाळेत 51 सायकलची सायकल बँक भरण्याचा संकल्प करून अगदी दोन महिन्यात जवळपास 40 सायकल साठी दोन लाख रुपयांचा निधी उभारण्यात महत्त्वाचा सहभाग घेतला.
आजपर्यंत त्यांना दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांचे वतीने ,'आदर्श शिक्षक' पुरस्कार तसेच रोटरी क्लब अकलूज यांच्यावतीने 'नेशन बिल्डर अवॉर्ड तसेच सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांचे वतीने ,'गुणवंत शिक्षक' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
आजपर्यंत पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत . .त्यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या 'नवी दिशा', 'चोरावर मोर', 'कायापालट' या बालनाट्याची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आलेला आहे. साक्षरता अभियान काळात त्यांनी लिहिलेल्या व अभिनय केलेल्या 'अक्षरदान'या एकपात्री प्रयोगाने समाजामध्ये जनजागृती केली. त्यांनी अनेक शाळा कॉलेज व महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
तसेच विविध प्रशिक्षणामध्ये शिष्यवृत्ती, इंग्रजी इत्यादी विषयांवर शिक्षकांनाही मार्गदर्शन केले आहे. माळेवाडी बोरगाव या शाळेमध्ये कार्यरत असताना एका वर्षामध्ये संगणक, प्रिंटर वॉश बेसिन इत्यादींच्या माध्यमातून जवळपास दोन लाख रुपयांचे शैक्षणिक उठावाचे कार्य केले.
त्यांची 'येणे वाग्यज्ञे तोषावे' ही पसायदानाचा अर्थ सांगणारी लेखमाला वाचकांच्या पसंतीस उतरली. 'योद्धा संन्यासी' हा त्यांचा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील लेख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
अनेक वेळा रक्तदान करून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला. वीरशैव लिंगायत समाजाच्या अनेक धरणे धार्मिक कार्यक्रमांमध्ये 'परम रहस्य,' या ग्रंथावर त्यांनी अनेक प्रवचने केलेली आहेत.
सध्या जिल्हा परिषद शाळा निमगाव (म) येथे कार्यरत असताना सन 2019 20 मध्ये जवळपास पाच लाख 28 हजार रुपये चा शैक्षणिक व सामाजिक कार्य करून विद्यार्थ्यांना मोफत टाय,बेल्ट, बूट ,सॉक्स देण्यामध्ये त्यांनी मोलाचा सहभाग उचलला.
2021- 22 मध्ये शाळेमध्ये 51 सायकलची सायकल बँक भरण्याचा संकल्प करून अगदी दोन महिन्यात जवळपास 40 सायकल साठी दोन लाख रुपयांचा निधी उभारण्यात महत्त्वाचा सहभाग घेतला.
आजपर्यंत त्यांना दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांचे वतीने ,'आदर्श शिक्षक' पुरस्कार तसेच रोटरी क्लब अकलूज यांच्यावतीने 'नेशन बिल्डर अवॉर्ड तसेच सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांचे वतीने ,'गुणवंत शिक्षक' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या कार्याची दखल घेत लिंगायत समाज कल्याणकारी मंडळाने त्यांना 'जीवनगौरव,' पुरस्कार देऊन सन्मानित केले .या पुरस्कार प्राप्ति बद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.