वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मा.पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रकानुसार.मा अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी तक्रार निवारण दिन सप्टेंबर महिन्यातील गुरुवारी आयोजित केलेला असून बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडे चौकशी साठी प्रलंबित असलेले अर्ज प्रकरणे तसेच इतर प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी उद्या दिनांक ०९/०९/२०२१ रोजी स.१०.०० वा तक्रार निवारण दिन ठेवण्यात आलेला असून सपोनि सोमनाथ लांडे यांनी पो.स्टे.कडील प्रलंबित अर्जातील अर्जदार व गैरअर्जदार यांनी उद्या कागदपत्रे सहित हजर राहण्याचे आवाहन केलेले आहे.